मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधिल रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची तब्बल २ हजार ८८ पदे आणि प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
— Uday Samant (@samant_uday) November 9, 2021
वरिष्ठ महाविद्यालयांमधिल रिक्त असलेली विविध विषयांची प्राध्यापकांची पदे भरण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.त्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. राज्यातील प्राध्यापकांची पदे भरण्याची घोषणा मागील काही महिन्यांपूर्वी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती.त्यासंदर्भात मुख्यमंत्री व उपमख्यमंत्री यांच्या झालेल्या बैठकीत प्राध्यापकांच्या पहिल्या टप्प्यातील २ हजार ८८ प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्यांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.