काँग्रेसचे एक नव्हे तर तब्बल चार मंत्री कोरोना बाधित

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत काही आमदार आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच अधिवेशन संपताच काँग्रेसचे एक नव्हे तर तब्बल चार मंत्री कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी याची माहिती ट्विट करून दिली आहे.

हिवाळी अधिवेशनच्या काळात काही आमदार आणि अधिक-यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर अधिवेशन संपताच बडे नेते कोरोना बाधित झाले असल्याचे समोर आले आहे.राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली.त्यांची माहिती त्यांनी स्वत: दिली.तर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी पाडवी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.खरबरदारी म्हणून मंत्रालय समोर असणारे त्यांचे आणि गायकवाड यांचे निवासस्थान मुंबई महानगरपालिकेचे सील केले.त्यापाठोपाठ आज राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांनी याची माहिती ट्विट करून दिली आहे.माझी कोरोनाची चाचणी सकारात्मक आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही,तरी डॅाक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.विशेष म्हणजे अधिवेशन संपताच काँग्रेसच्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Previous articleबेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही,याची खबरदारी घ्या
Next articleधोका वाढला : राज्यात कोरोनाचे ८ हजार ६७ तर ओमायक्रॉन ४ नवीन रुग्ण