धोका वाढला : राज्यात कोरोनाचे ८ हजार ६७ तर ओमायक्रॉन ४ नवीन रुग्ण

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढ झपाट्याने वाढताना दिसत आहे. आजच्या एका दिवसात राज्यात ८,०६७ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रूग्ण आढळून आले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कोरोना रूग्णांची वाढ झपाट्याने वाढताना दिसत आहे.कालच्या पेक्षा आज रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ जाली आहे.आज राज्यात एकूण ८,०६७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.आज राज्यात ४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून झाले आहेत.वसई विरार,नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळला आहे. त्यामुळे आजपर्यंत राज्यात एकूण ४५४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून झाले आहेत.आज १,७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले, राज्यात आजपर्यंत एकूण ६५,०९,०९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४६ टक्के एवढे झाले आहे.सध्या राज्यात १,७५,५९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १०७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Previous articleकाँग्रेसचे एक नव्हे तर तब्बल चार मंत्री कोरोना बाधित
Next articleमुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचे वर्चस्व ; सहकार पॅनेलचा २१ जागांवर दणदणीत विजय