मुंबई नगरी टीम
मुंबई । विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय हेतून प्रेरित असून तो चुकीचा असल्यामुळे सदर गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी प्रविण दरेकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.खंडपीठाने सदर याचिकेवर अंतरिम दिलासा देण्याची मागणी फेटाळली.परंतु अटकपूर्व जामिनासाठी दरेकर हे सत्र न्यायालयात अर्ज करु शकतात असे नमुद केले.गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली नसून यावर मुंबई उच्च न्यायालयात सदर याचिकेवर सुनावणी सुरु आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा राजकीय हेतून प्रेरित असून तो चुकीचा असल्यामुळे सदर गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी प्रविण दरेकर यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सदर याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्या.वराळे आणि न्या.मोडक यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. दाखल करण्यात आलेला गुन्हा हेतुपुरस्परपणे दाखल केला असून याला कुठलाही आधार नाही,त्यामुळे सदर गुन्हा रद्द करण्यात यावा असा युक्तीवाद आजच्या सुनावणीप्रसंगी करण्यात आला.मात्र या सुनावणीप्रसंगी खंडपीठाने सदर याचिकेवर अंतरिम दिलासा देण्याची मागणी फेटाळली.परंतु अटकपूर्व जामिनासाठी दरेकर हे सत्र न्यायालयात अर्ज करु शकतात असे नमुद केले.गुन्हा रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली नसून यावर मुंबई उच्च न्यायालयात सदर याचिकेवर सुनावणी सुरु आहे. दरेकर यांच्यावतीने ॲड. अखिलेश चौबे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर जेष्ठ वकील ॲड. आबाद पोंडा यांनी युक्तीवाद केला.
या सुनावणीप्रसंगी झालेल्या युक्तीवादासंदर्भात माहिती देताना ॲड. अखिलेश चौबे यांनी सांगितले की,ज्या प्रकरणासंदर्भात सदर गुन्हा नोंदविण्यात आला आहे, त्याच प्रकरणात यापुर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी एका गुन्ह्यात मध्ये पोलिसांनी “सी” समरी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता, तो न्यायालयाने स्विकारला. तर दुस-या गुन्ह्यामध्ये मध्ये “सी” समरी न्यायदंडाधिकारी यांनी नाकारण्यात आली होती. त्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून या प्रकरणी न्यायालयाने कोणतीही जबरदस्तीची कारवाई नसल्याचे आदेश दिले आहेत. तरीही सरकारने याच प्रकरणात सुड बुध्दीने काल तिसरा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरण हे २०१०-११ मधील आहे.