दर महिन्याला निवडणुका लावा म्हणजे गॅस,पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत

मुंबई नगरी टीम

मुंबई । जेव्हा निवडणुका असतात तेव्हा केंद्र सरकार गॅस,पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्र सरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत असा टोला काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केली.

लोकसभेत गॅस,पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडला. केंद्रसरकारला चार राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले.पण निवडणूका संपताच केंद्रसरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली.महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे असा आरोपही खासदार सुळे यांनी केला.

Previous article‘काश्मीर फाईल्स’ मधून जमा झालेल्या १५० कोटीतून कश्मिरी पंडितांसाठी घरं बांधा
Next articleनारायण राणे, कृपाशंकर सिंहांवर किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपाचे काय झाले ?