अखेर ऊर्जामंत्र्यांच्या लेखी आश्वसनानंतर वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई नगरी टीम

मुंबई । गेल्या दोन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आल्याने राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार नाही तसेच बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशीही मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली होती. याबाबत तातडीने सूचना देऊन ते बदलण्यात येईल असे आश्वसन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कर्मचा-यांना दिल्याने संप मागे घेण्यात येत असल्याची घोषणा वीज कर्मचारी संघटनांनी केली.

गेल्या दोन दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी वीज कर्मचा-यांनी संपाचे हत्यार उपसले होते.संपावर तोडगा काढण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आज कर्मचारी संघटनांची बैठक पार पडली.बदली धोरणासंदर्भात घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी वीज कर्मचाऱ्यांनी या बैठकीत केली.याबाबत तातडीने सूचना देऊन ते बदलण्यात येईल असे आश्वसन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले असल्याचे कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले. तसेच कंत्राटी कामगारांना सुरक्षा देण्याबाबत चर्चाही आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.ऊर्जामंत्री राऊत यांनी दिलेल्या लेखी आश्वसनानंतर संप मागे घेत असल्याचे संघटनेने जाहीर केले.नोकरभरती ही जाहीरातीच्या माध्यामातून होते.आमचे आंदोलन हे केद्र शासनाच्या नव्या बिलाविरोधात होते. केद्र सरकारडून खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याने हा संप सुरू झाला होता.मात्र राज्याने आपली भूमिका याविरोधात असल्याचे आश्वासन वीज कर्मचाऱ्यांना दिले असल्याने संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे.

Previous articleअंगणवाडी सेविका,मदतनीस यांच्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय
Next articleधनंजय शिंदे, नाना पटोले, भाई जगताप यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार