संजय राऊतांवरील कारवाईमुळे केंद्राचा कारभार कसा सुरूय हे लक्षात येतय

मुंबई नगरी टीम

मुंबई । संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी करत असेल तर केंद्रसरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही.राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या आणि भाजपने कर्नाटकात आंदोलन सुरु केलेल्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली.राज्यामधील सर्व परिस्थिती नियंत्रणात असून, सर्व पोलिस अधिकारी आपापल्यापरिने काळजी घेत आहेत.भविष्यकाळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस दल प्रयत्न करत आहे.जनतेने देखील त्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी गृहमंत्री वळसे पाटील यांनी केले. हिंदू मतांचे विभाजन करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण केली जाते.राज्याची पोलिस यंत्रणा सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्रात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा ठाम विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांना कुठल्याही प्रकारची नोटीस न देता किंवा चौकशी न करता ईडीकडून अशाप्रकारची कारवाई होत असेल,तर केंद्र सरकार कशा पद्धतीने कारभार करत आहे, हे आपल्याला लक्षात येते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.तसेच कितीही कारवाई झाली तरी सरकारला कोणताही धोका नाही, सरकार आपले पाच वर्ष पुर्ण करेल, असेही गृहमंत्री म्हणाले.

Previous articleसंजय राऊत झुकेंगा नहीं ! ईडीच्या कारवायांनी संजय राऊत किंवा शिवसेना झुकणार नाही
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत काय चर्चा झाली ? शरद पवारांनी दिली माहिती