मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईतील वरळी विधानसभा मतदार संघातून विजयी परंपरा कायम ठेवणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा या मतदार संघातून विजय सुकर झाला होता.वरळी मतदार संघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडणारे वरळीचे शिवसेनेचे माजी आमदार सुनिल शिंदे यांना विधानपरिषदेत संधी दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यासाठी वरळी मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणारे आणि शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर यांना विधानपरिषदेत संधी देत शिवसेनेने अखेर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.
शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांचे अखेर राजकीय पुनर्वसन केले आहे.अहिर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाली आहे.मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आली नाही.शिवसेनेकडून अपेक्षेप्रमाणे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा येत असल्याने शिवसेनेने माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदुरबारचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली.सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधत वरळी मतदार संघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे आदित्य ठाकरे यांचा विजय सुकर झाला होता.आदित्य ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यासाठी वरळी मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणारे आणि शिवसेनेत प्रवेश केलेले सचिन अहिर यांना विधानपरिषदेत संधी देत शिवसेनेने अखेर त्यांचे राजकीय पुनर्वसन केले आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील गोरेगाव विधानसभा मतदार संघातून पराभव झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली होती.फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना उद्योगमंत्री पदाची संधी देण्यात आली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर देसाई यांना पुन्हा उद्योग हे खाते देण्यात आले. सुभाष देसाई हे विधानपरिषदेतून निवृत्त होत आहे.शिवसेनेत ज्येष्ठ नेते असलेले माजी मंत्री दिवाकर रावते हे ही विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.शिवसेनेकडून देसाई यांना पुन्हा संधी दिली गेली तर रावते नाराज झाले असते. त्यामुळे देसाई यांना पुन्हा संधी दिली गेली नसल्याची चर्चा आहे.