‘ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही’…अजितदादांनी उडवली बावनकुळेंची खिल्ली

मुंबई नगरी टीम

पुणे । बारामती लोकसभा काबीज करण्याची वार्ता करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांच्या यांच्या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतला.बावनकुळे नुसत्या गप्पा मारायचे काम करतात,ज्या माणसाला स्वतःचा पक्ष उमेदवारी देत नाही,त्यांच्या पत्नीला दिलेली उमेदवारी काढून घेतली जाते ही यांची विश्वासहर्ता असल्याने त्यांनी माझ्याकडे येऊन काय गप्पा माराव्या असे सांगत,मी खंबीर आहे.अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची खिल्ली उडवली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण या बारामतीच्या दौ-यावर येत आहेत.त्यांच्या या दौ-याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बानवकुळे यांना बारामतीत जावून आढावा घेतला.या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बारामती लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार लाखाच्या मतांनी विजयी होईल, अशी गर्जना केली होती.बावनकुळे यांच्या या वक्तव्याचा समाचार विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात बोलताना घेतला आहे.आता बारामतीत आम्ही हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसे चालेल,माझ्या बहिणीला अजून कुठे मतदार संघ मिळतोय का ते बघतो अशा शब्दात त्यांनी बावनकुळे यांना टोला लगावला.यावेळी त्यांनी न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावरही भाष्य केले. राज्यातील शिंदे सरकार अजून स्थिरस्थावर नाही.त्यातच न्यायालयात तारीख पे तारीख सुरू आहे.सत्ताधा-यांनी कितीही आव आणला तरी त्यांच्यावर टांगती तलवार आहे असेही पवार यावेळी म्हणाले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती.त्यांनी याच मैदानात झालेल्या मेळाव्यात यापुढे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी निभावतील असे सांगितले होते.आणि तेच म्हणणे शिवसैनिकांचे असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.राज्य निवडणूक आयोगाने जशा ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या तशाच इतर निवडणुका झाल्या पाहिजेत.मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेसोबत लढणार असल्याचे स्पष्ट संकेत यावेळी पवार यांनी देत न्यायालयातील निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल असे तज्ञांचे मत असल्याचे सांगून,भाजपला महागाईवर भाष्य करीत नाही,शिवाय शेतकऱ्यांनाही मदत केली जात नाही,लोकांचे लक्ष दुसरीकडे विचलित करण्याचे काम बाजप करीत असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

Previous articleराज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज ! मंत्र्यांकडे वेळ मागूनही मिळत नाही : सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत
Next articleसामान्य नागरिकांना कामांसाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश