भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग : जयंत पाटील यांचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरू असून,या प्रकरणी राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे.भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे.एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही.ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे.खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात आहे.भाजपचा खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे.खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही पाटील यांनी यावेळी केला आहे.राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचे काही केलेले नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा पाटील यांनी व्यक्त केला आहे.खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Previous articleधो..धो..पावसात नाना पटोलेंनी सायकल चालवत केला मोदी सरकारचा निषेध
Next articleयुती किंवा आघाडीची चिंता करू नका,शिवसेना बळकटीसाठी कामाला लागा