शिवसेनेची वचनपुर्ती : औरंगाबादचे “संभाजीनगर” तर उस्मानाबादचे “धाराशिव” नामांतर

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी उद्या गुरूवारी होत असून,त्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेची वचनपूर्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे तर बंडखोरांच्या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती.अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि उद्या गुरूवारी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला बहुमत चाचणीस सामोर जावे लागणार असतानाच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशीव करण्यास मान्यता देण्यात आली आहे.हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

Previous articleडुकरं,नाल्याची घाण म्हणायचं तर दुसरीकडे समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय ? एकनाथ शिंदे संतापले
Next articleनवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव