ईव्हीएम विरोधातील जनआंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा

ईव्हीएम विरोधातील जनआंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठींबा

मुंबई नगरी टीम

मुंबई :  ईव्हीएम विरोधात उभारल्या जाणाऱ्या जनआंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर पाठींबा असल्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएम  विरोधात उभारलेल्या राष्ट्रीय जनआंदोलन या संघटनेच्या माध्यमातून ईव्हीएमद्वारे होणाऱ्या निवडणुकांना विरोध दर्शवण्यात आलाय. ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय जनआंदोलनाची पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडली.९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम विरोधात निघणाऱ्या रॅली मध्ये सहभागी होणार असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी विजयाची खात्री असलेला उमेदवार देऊनही पराभवाला तोंड द्यावे लागले. काही ठिकाणी तर उमेदवाराला त्याच्या घरातीलदेखील मत मिळाली नाहीत असे प्रकारही समोर आले. शिवाय ईव्हीएम प्रणालीमध्ये घोळ असल्याची शंका याआधी लोकसभेत निवडून आलेल्या उमेदवारांनी सुद्धा व्यक्त केली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएम विरोधात चळवळ उभी करायची ठरवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा या ईव्हीएमविरोधी चळवळीला पूर्णत: पाठींबा आहे असे यावेळी पाटील यांनी सांगितले.

ईव्हीएम विरोधात राष्ट्रीय जनआंदोलनच्या बैठकीला  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतपाटील,शेकापचे नेते आमदार जयंत पाटील,जनता दल सेक्यूलरचे राष्ट्रीय महासचिव आणि माजीन्यायमूर्ती बी.जी.कोळसेपाटील,केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी,सीपीआयचे मुंबई महासचिव कॉम्रेड प्रकाश रेड्डी, समाजवादीचे मुंबई महासचिव मिराज सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील,आपचे राज्य समिती सदस्य धनंजय शिंदे, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू आदी उपस्थित होते.

Previous articleधनगर समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय
Next articleखूशखबर : सरपंचांच्या मानधनात वाढ