संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही : रामदास आठवले

संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही : रामदास आठवले

मुंबई नगरी टीम

मुंबई : लंडनमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ देणार नाही त्यासाठी त्वरित परराष्ट्र मंत्रालय आणि लंडन मधील भारतीय उच्चायुक्तालयाशी आपण संपर्क साधता आहोत. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानसूर्य म्हणून अवघे विश्व सन्मान करीत असून लंडनमधील पालिकेचा हा निर्णय ब्रिटन सरकारने रद्द करावा यासाठी भारत सरकार तर्फे प्रयत्न करीत असल्याचे असल्याचे  रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

लंडन मधील हेनरी रोड वरील या  संग्रहालयास अन्यत्र हलविण्याचा लंडनमधील स्थानिक पालिकेचा निर्णय आहे. हा निर्णय रद्द  करण्यासाठी लंडन च्या  स्थानिक न्यायालयात  महाराष्ट्र सरकार ने अपील केले आहे. भारत सरकारतर्फे ही ब्रिटन सरकार शी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. ब्रिटन आणि भारत दोन्ही सरकार मध्ये चांगले संबंध असून लंडन मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा संग्रहालय दर्जा रद्द होऊ नये म्हणून आपण सर्व स्तरावर प्रयत्न करीत असून  वेळ पडल्यास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची याप्रकरणी भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे  आठवले यांनी सांगितले.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार
Next articleलंडनमधील डॉ. आंबेडकर ‘स्मारकाचा’ दर्जा कायम रहावा: वडेट्टीवार