मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई नगरी टीम

मुंबई : मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून प्रियांका गुप्ता या महिलेने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या जाळीमुळे या महिलेचे प्राण वाचले असून, प्राथमिक चौकशी करून तिला सेंट जॅार्ज रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

उल्हासनगर येथील प्रियांका गुप्ता वय ३५ वर्षे, या महिलेने दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रियांका गुप्ता आणि त्यांचे पती पवन गुप्ता यांच्यावर शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.दं.वि.सं.कलम नुसार ९ डिसेंबर रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी हि महिला मंत्रालयात आली होती.आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी या प्रकरणाचे निवेदन संबंधित विभागाला दिले असल्याचे समजते.त्यानंतर या महिलेने चौथ्या मजल्यावर जात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.यावेळी माझ्या पतीला वाचवा अशी मागणी तिने केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर पडल्याने या महिलेचे प्राण वाचले.हि घटना घडताच मंत्रालयात कर्तव्यावर असणा-या पोलीसांनी या महिलेला सुरक्षित बाहेर काढले.

चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याने गुप्ता यांना मुका मार लागला आहे.सुरक्षेवर तैनात असलेल्या पोलीस कर्मचा-यांनी या महिलेची प्राथमिक चौकशी करून पुढील उपचारासाठी सेंट जॅार्ज रूग्णालयात दाखल केले आहे.राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रालयात घडलेली हि पहिलीच घटना आहे.पुढील तपास मरीन ड्राइव्ह पोलिसांनी करीत आहेत.

Previous article…अन शिष्याने गुरूंना बांधला फेटा!
Next articleमुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३५ लाख ८ हजार रुपयांची मदत