कोरोनाच्या लढाईस यश… पुन्हा लढण्यास सज्ज : जितेंद्र आव्हाड

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनावर मात करून रूग्णालयातून घरी परतलेले राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांशी ट्विटरच्या माध्यमातून प्रथमच संवाद साधला आहे. कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेले असून, मी आज सुखरूप घरी जात आहे असे स्पष्ट करतानाच डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही, त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत असलेले मुंब्रा कळव्याचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री  जितेंद्र आव्हाड हे कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्यानंतर १९ एप्रिल नंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेले असून, मी आज सुखरूप घरी जात आहे.यापुढेही तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच राहू द्या.परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे, गृहनमंत्री अनिल देशमुख ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,आरोग्यमंत्री राजेश टोपे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.माझ्या हितचिंतकांना,कार्यकर्त्यांना माझे एक सांगणे, आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल.

धन्यवाद

अपने कदमों के काबिलियत पर

विश्वास करता हूं ,

कितनी बार तूटा लेकीन

अपनो के लिये जीता हूं ,

चलता रहूंगा पथपर

चलने मैं माहीर बन जाऊंगा

या तो मंजिल मिल जायेगी

या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.

ट्विटच्या शेवटी त्यांनी ही शेरोशायरीचा उल्लेख केला आहे.

Previous articleकाँग्रेसकडून मोदींना उमेदवारी;विधान परिषद निवडणूकीत चूरस
Next articleराष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावाची घोषणा