महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क आकारु नये, रोहित पवारांचं आवाहन

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनाच्या कठीण काळात महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क आकारणं योग्य नसल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. ट्विटरवर एका विद्यार्थ्याच्या समस्येवर उत्तर देताना महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क न आकारण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच ही समस्या सोडवण्याचं आश्वासन देखील रोहित पवारांनी यावेळी दिलं.

सध्या देशाची वाटचाल टाळेबंदीच्या शिथीलतेच्या दिशेने सुरु आहे. हळूहळू अनेक व्यावसाय पुर्वपदावर येत आहेत. मात्र या प्रक्रियेत शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शुल्क भरुन घेत आहेत. इतंकच काय तर महाविद्यालयांकडून डेव्हलपमेंट शुल्क देखील आकारलं जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. यावर रोहित पवारांनी महाविद्यालयांची ही भूमिका योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

“अशा अडचणीच्या काळात महाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क घेणं योग्य नाही. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत साहेबांसोबतही चर्चा झाली आहे. त्यांचंही याकडं लक्ष असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा”, अशी ग्वाही रोहित पवारांनी दिली आहे.पुणे एमआयटीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरच्या माध्यमातून ही समस्या रोहित पवारांपुढे मांडली. सोशल मिडियावर कायम अॅक्टिव असणा-या रोहित यांनी देखील या समस्येची दखल घेतली. “तुम्हाला माहित आहे की, हे वर्ष शेतक-यांसाठी किती कठीण आहे. आमचा विरोध महाविद्यालयाची फी भरण्याला नाही. आम्ही महाविद्यालयात जात नाही, कुठलीही फॅसिलीटी घेत नाही. तरीही  महाविद्यालये डेव्हलपमेंट फी घेतली जात असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने केली होती. यावर आता कोणता निर्णय होईल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागून आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही! काँग्रेस नेत्याचा टोला
Next articleराज्य पोलिस तक्रार प्राधीकरणावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती !