“तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात”… पार्थ पवारांच्या समर्थनार्थ मल्हार पाटलांची पोस्ट 

मुंबई नगरी टीम                                                                                                                                                                            मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण आले होते. शरद पवारांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या समर्थनार्थ आता माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे नातू आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पूत्र मल्हार पाटील हे उभे राहिले आहेत. मल्हार यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे पार्थ यांच्यासाठी म्हटले आहे.

                                                                                                                                    मल्हार पाटील यांनी पार्थ पवारांचा फोटो पोस्ट करत म्हटले, “आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचे कसे हे आपल्याला माहित आहे”. दरम्यान ही पोस्ट आपण राजकीय हेतूने नव्हे तर नातेसंबंधातून केली असल्याचे मल्हार यांनी म्हटले आहे.

                                                                                                                                    बुधवारी शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांनीपार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चाैकशीची मागणी केल्याच्या भूमिकेविषयी शरद पवारांना प्रश्न विचारला होता. माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, ते अपरिपक्व आहेत, अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली होती.

Previous articleआमच्या सरकारचे सगळे पूल भक्कम,सरकारला कसलाही धोका नाही
Next articleराष्ट्रवादीच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू, सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली