एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण; उपचारासाठी मुंबईला रवाना

मुंबई नगरी टीम

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून, मुंबईतील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत.याची माहिती खुद्द खडसे यांनी समाज माध्यमातून दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना गेल्याच आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.त्यामुळे एकनाथ खडसे यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता.त्यांनतर आज एकनाथ खडसे यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत ६ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी हि विनंती.पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल असे आवाहन खडसे यांनी समाज माध्यमातून केले आहे.

रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एकनाथ खडसे होम क्वारंटाईन झाले होते.त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा दोन दिवसांचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द केला होता.राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी जळगाव जिल्हा पिंजून काढत भाजपातील अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत आणले होते.त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यानंतर आता एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Previous articleमुंबई मनपा निवडणुकीत मनसेला सोबत घेणार का ?, भाजप नेत्यांनी केला हा खुलासा
Next articleठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा ?