धक्कादायक : मुंडेंवर आरोप करणा-या महिलेचे एकाच दिवसात तीन कारनामे उघड

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा नामक महिलेवर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याची तक्रार पोलिसात दिली आणि या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. याच महिलेकडून असाच प्रयत्न मनसे नेते मनीष धुरी यांच्यासोबत देखील घडला असल्याचे उघड झाले; हे प्रकरण ताजे असतानाच आता रेणू शर्माचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे.

रेणू शर्मा हिने जेट एअरवेज कंपनीत अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी नामक तरुणाला देखील असेच छळले होते हे पोलिसात दिलेल्या कागदपत्रांपैकी काही हाती लागलेल्या कागदपत्रांवरून समजते आहे. सोशल मिडीयावरून ओळख झाली, त्यानंतर मैत्री, त्यानंतर भेटीगाठी, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. हे जवळपास दोन वर्ष चालले त्यानंतर मात्र या महिलेने रिझवान कुरेशी विरोधात याच आंबोली पोलीस ठाण्यात विनयभंगाची व बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता, रिझवान कुरेशी या जेट एअरवेज कम्पनी मधील एका अधिकाऱ्याच्या रेणू शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून मे २०१८ मध्ये संपर्कात आली.त्यानंतर त्यांच्यात मैत्री, हॉटेलिंग आणि बरेच काही घडले. पण जुलै २०१९ अखेर याच रिझवान विरुद्ध रेणू शर्मा हिने पोलिसात विनयभंग व बलात्काराचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा नामक ही महिला सोशल मीडियावरील स्टार मेकर या चायनीज अँप वर गायनाचे काम करत करत अनेकांच्या संपर्कात असल्याचेही समोर आले आहे. रिझवान कुरेशी यांच्या ती मे २०१८ ते जुलै २०१९ पर्यंत संपर्कात होती, त्यानंतर तिने पोलिसात तक्रार केली, कदाचित पैसे मागणी किंवा हनी ट्रॅप सारखेच रिझवान कुरेशी प्रकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिझवान यांच्यासोबत जे घडले तोच प्रकार हेगडे, धुरी आणि आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबतही घडत नाही ना, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो. तथापि मंत्री धनंजय मुंडे, भाजप नेते कृष्णा हेगडे, मनसे नेते मनीष धुरी आणि आता हे रिझवान कुरेशी इतक्या लोकांच्या ही महिला एक्याच वेळी संपर्कात कशी काय आली? यामागचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. तर दुसरीकडे अशा महिलेने मुंडेंवर केलेल्या आरोपात काही तथ्य आहे की, मुंडेंनी खुलासा केल्याप्रमाणे हे फक्त ब्लॅकमेलिंगचेच प्रकरण आहे, अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.

Previous articleधनंजय मुंडे प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले ?
Next articleधनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय