देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या ? याचाही खुलासा झाला पाहिजे

मुंबई नगरी टीम

सांगली । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून पोलीस दलातील बदल्यांप्रकरणी आरोप केल्यानंतर राज्याचे जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. राज्यातील जनता जास्त भीक घालणार नसून,पोलीसांच्या बदल्या या अस्थापना बोर्डाने केल्या असल्याने त्यांनी अहवाल चुकीचा आहे.फडणवीस यांनी दिलेली माहिती ही धादांत चुकीची आहे असे सांगून देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या याचाही खुलासा होणे गरजेचे आहे,असेही पाटील म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस दलातील बदल्यासंदर्भात खळबळजनक आरोप केल्यानंतर सांगलीत झालेल्या पत्रकार परिषदेत जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. राज्यातील जनता जास्त भीक घालणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.पोलीसांच्या बदल्या या अस्थापना मंडळाने केल्या असल्याने, तो अहवाल चुकीचा आहे. फडणवीस यांनी दिलेली माहिती ही धादांत चुकीची आहे असेही पाटील यांनी सांगितले.रश्मी शुक्ला पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगून, रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचा अधिकार कोण दिला ? असा सवाल त्यांनी केला. शुक्ला यांनी केवळ गृहमंत्र्यांवर वॉच ठेवण्याचे काम केले, रश्मी शुक्ला अधिकारी असताना त्यांनी काय काय माहिती गोळा केली याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे पाटील म्हणाले.देवेंद्र फडणवीस यांच्या वेळी किती बदल्या झाल्या याचाही खुलासा होणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न यावेळी केला.जेव्हा देशाची सुरक्षितता धोक्यात असेल किंवा एखादा गुन्हा उघडकीस केला जात असेल तेंव्हा लोकांचे फोन टॅप केले जातात असे स्पष्ट करून, संकेत पायदळी तुडवून कोणाच्या आदेशाने लोकांच्या कॉलचे रेकॉर्डिंग केले ? लोकांचे संभाषण टॅप करण्याचा हा अधिकार यांना कोणी दिला ?, असा सवाल पाटील यांनी केला.

Previous articleअधिका-यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीसांकडून सरकारला बदनाम करण्याचे काम
Next articleदेवेंद्र फडणवीस सर्वात मोठे खोटारडे,फडणवीसांना वसुलीचा दांडगा अनुभव