१५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला; सध्या लागू असलेले निर्बंध कायम

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लागू केलेला लॉकडाऊन येत्या १५ मे पर्यंत वाढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली असून.त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आली आहेत.सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध येत्या १५ मे पर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.गेल्या १५ दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होण्याची शक्यता होती.मात्र राज्यातील काही शहरे वगळता कोरोनाचा कहर तसाच असल्याने अखेर राज्यात येत्या १५ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.राज्यात लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.याला सर्व मंत्र्यांनी संमती दिली होती. त्यानुसार या लॉकडाऊन शिक्कामोर्तब करण्यात येवून त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.सध्या लागू असलेले निर्बंध हे येत्या १५ मे पर्यंत कायम असणार आहेत.राज्यात लागू असलेले निर्बंध येत्या १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

Previous articleभाजी मार्केट आणि किराणा मालाची दुकाने दिवसभर खुली ठेवा : रामदास आठवलेंची मागणी
Next article१ मे ते १३ जून पर्यंत शाळांना सुट्ट्या ; १४ जून पासून शाळा सुरू होणार