भाजी मार्केट आणि किराणा मालाची दुकाने दिवसभर खुली ठेवा : रामदास आठवलेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे मात्र या काळात किराणा दुकाने, भाजी मार्केट,अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वेळेचे बंधन ठेवल्यामुळे या दुकानांवर आणि भाजी बाजरात गर्दी होत आहे.या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार अधिक वाढत आहे.त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी आणि भाजी मार्केट साठी वेळेचे बंधन न ठेवता दिवसभर ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

भाजी बाजार, अन्न धान्य किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत खुली ठेवण्याचा चुकीचा नियम राज्य सरकार ने सुरू केला आहे. या वेळेच्या बंधनामुळे सकाळी या दुकानांवर आणि भाजी बाजरात मोठी गर्दी उसळत आहे.त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजी बाजार यांना वेळेचे बंधन न ठेवता कोरोना पसरू नये याची काळजी घेत मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून ही दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे. वेळेचे बंधन न ठेवल्यास दुकानांवर भाजी बाजरात गर्दी होणार नाही असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.

Previous articleमोबाईल आणि उपकरणे विक्रेत्यांना ऑनलाईन विक्रीची परवानगी द्या : मनसेची मागणी
Next article१५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवला; सध्या लागू असलेले निर्बंध कायम