जलसंपदा विभागाच्या सचिव नियुक्तीवरून मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांमध्ये ठिणगी

मुंबई नगरी टीम

मुंबई । जलसंपदा विभागाच्या सचिव नियुक्तीवारून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यामध्ये ठिणगी उडाल्याचा गौप्यस्फोट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.यामुळे सरकारचा कारभार कसा चालला आहे हे पुढे आले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे.जलसंपदा विभागाच्या सचिव नियुक्तीवरून राज्याचे मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यात ठिणगी पडल्याचा गौप्यस्फोट दरेकर यांनी केला आहे.या प्रकरामुळे राज्यातील महाविकास आघाडीचा कारभार कशा प्रकारे चालला आहे हे या माध्यमातून पुढे आल्याचे दरेकर यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा विभागाबाबत घाईमध्ये निर्णय घेणार नसल्याचे सांगून एक प्रकारे यावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण दाखवण्याचे दिसून येत असे सांगतानाच राष्ट्रवादीच्या दबावाला जुमानत नाही,अशा प्रकारचा संदेश मुख्यमंत्र्यांना द्यायचा नाही ना असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून,त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करावी,अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये मध्ये आलबेल नसल्याचे दिसून येत आहे असेही दरेकर म्हणाले. यावरून कदाचित,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मिडियाला ६ कोटी खर्चाला मान्यता दिली होती,तो निर्णय सुद्धा मागे घ्यावा लागला, त्याचा सुद्धा या वादाला किनार असावी अशी शंका दरेकर यांनी व्यक्त केली.

Previous articleटीकेची झोड उठताच “सोशल मिडियाचा” निर्णय रद्द करण्याचे निर्देश
Next articleउत्तरप्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक : जयंत पाटील