उत्तरप्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक : जयंत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई । उत्तरप्रदेश सरकारला कोरोनाचा सामना करण्यात अपयश आले आहे,म्हणूनच स्मशानभूमी कमी पडत असावी,काही समस्या असेल, म्हणून मृतदेह नदीत सोडत असावेत, मात्र उत्तरप्रदेशमध्ये जे घडलं ते धक्कादायक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनावर आता लसीकरण हाच समस्येवर उपाय आहे. दुस-या लससाठी केंद्राकडून लस येणे अपेक्षित होते, मात्र ती लस येत नाही,दोन लसीमधील अंतर वाढले तर फरक पडेल का ? याची शास्त्रीयदृष्ट्या माहीती नाही असेही पाटील म्हणाले. दरम्यान कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता लस निर्मितीचे कारखाने येथे उभे करायला पाहिजेत असे मतही पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

Previous articleजलसंपदा विभागाच्या सचिव नियुक्तीवरून मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांमध्ये ठिणगी
Next articleड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याच्या नावाखाली राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग : नाना पटोले