कोरोना काळात सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण ? मोदींना ९० टक्के मतं

मुंबई नगरी टीम

नवी दिल्ली । आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपयश आले असल्याची टीका केली असतानाच दुसरीकडे अमेरिकेतील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना ९० टक्के मते देवून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता ठरवले आहे.

जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमधील नेत्यांसंदर्भात घेण्यात आलेल्या एका ऑनलाइन जनमत चाचणीमध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारा नेता कोण असा प्रश्न अमेरिकेमधील द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये विचारला होता.द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटच्या या पोल मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक ९० टक्के मते देवून सर्वात वाईट कामगिरी करणारे नेतृत्व अशी पसंती दिली आहे.द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये पाच देशांमधील तज्ज्ञांच्या मदतीने त्यांच्या देशातील नेतृत्वाने कशाप्रकारे कोरोनाची परिस्थिती हाताण्यात गोंधळ घातला असा प्रश्न विचारत,”सर्वात वाईट कामगिरी कोणी केली, असा प्रश्न विचारला होता.ट्विटरवर केवळ चारच पर्याय देण्यात आले होते.या चार या चार पर्याया पैकी उत्तर कमेंट करुन कळवा, असे म्हणत पोल पोस्ट करण्यात आला होता.यामध्ये ब्राझीलचे बोल्सोनारो, भारताचे नरेंद्र मोदी,मॅक्सिकोचे अ‍ॅमलो आणि अमेरिकेचे ट्रम्प,असे चार पर्याय देण्यात आले होते.या जनतमचाचणीमध्ये ९० टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत दिले आहे.

या पोलमध्ये एकूण ७५ हजार ४५० जणांनी आपली मते नोंदवली आहेत.त्यापैकी सर्वाधिक मते ही मोदी यांना मिळाली आहेत.७५ हजार ४५० जणांपैकी ६७ हजार ९०५ जणांनी मोदी हे जगामध्ये कोरोना परिस्थिती हाताळ्यात सर्वात वाईट कामगिरी करणारे नेते असल्याचे मत नोंदवले आहे.मोदींच्या खालोखाल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ५ टक्के तर बोल्सोनारो यांना ३.७ टक्के मते मिळाली आहेत. मॅक्सिकोच्या अ‍ॅमलो यांना या पोलमध्ये केवळ १.३ टक्के मते मिळाली आहेत.द कॉनव्हर्सेशन या वेबसाईटने ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांपैकी भारतीय नेतृत्व हे साथरोगाची परिस्थिती हातळ्यात सर्वात सुमार कमागिरी करणारे ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोनाच्या दुसरी लाट हाताळण्यात मोदी यांना अपयश आले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी भारतातील कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये पंतप्रधान मोदींना पयश आल्याची टीका केल्याने द कॉनव्हर्सेशनच्या जनमत चाचणीवरून विरोध मोदींना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.

Previous articleमराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहेत !
Next articleविरोधी पक्षनेते वैफल्यग्रस्त : उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र