अटकेच्या भीतीमुळेच अनिल देशमुखांनी ईडीची चौकशी टाळली

मुंबई नगरी टीम

मुंबई । ईडीने पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावल्यानुसार त्यांनी चौकशीला सामोरे जावे व ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. ईडी चौकशीनतंर पलांडे आणि शिंदे यांना अटक करण्यात आल्यामुळे आपल्याबाबतही तसेच होईल अशी त्यांना भीती वाटत असावी.या भीती पोटी देशमुख यांनी चौकशीला जाण्यासाठी नकार दिला असावा, असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.

कोरोना काळात सोशल डिस्टसिंग तसेच इतर परिस्थितीत आणि वय ७२ असल्यामुळे स्वत: ईडी कार्यालयात उपस्थितीत न राहण्यासाठी विनंती देशमुखांनी या ईडीकेड पत्रातून केली आहे. या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, ईडीला हे अपेक्षित आहे ते होणारच आहे ते टाळता येऊ शकत नाही. कायद्यासामोर कोणालाही पळवाट काढता येत नाही. कायदा हा सर्वांना सारखा असतो. कायद्यासमोर काही कारण काढलं तरी आपण लपु शकत नाही व लांब जाऊ शकत नाही जे सत्य आहे समोर येणारच आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

Previous articleमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा : ‘या’ विद्यार्थ्यांचे पदवी,पदव्युत्तर पर्यंतचे पुर्ण शुल्क माफ
Next articleतासाभराच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली ?