हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील होणार ठाकरे घराण्याची सून

मुंबई नगरी टीम

मुंबई । माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंदूमाधव ठाकरे यांच्याशी येत्या २८ डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे.आज हर्षवर्धन पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून लग्नाचे निमंत्रण दिले.

माजी मंत्री आणि सध्या भाजपमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील यांची कन्या आणि पुणे पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील या ठाकरे घराण्याच्या सून होणार आहेत.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांच्याशी येत्या २८ डिसेंबर रोजी त्यांचा विवाह होणार आहे.या पार्श्वभूमीवर आज हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून लग्नाचे निमंत्रण दिले.येत्या 28 डिसेंबरला मुंबईमध्ये निहार बिंदूमाधव ठाकरे आणि अंकिता पाटील यांचा विवाह काही मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे.निहार ठाकरे हे पेशाने वकील आहेत तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत.त्या काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे.

Previous articleस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा : चंद्रकांत पाटलांची मागणी
Next articleओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकला