शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा ; महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा धसका महाविकास आघाडीने चांगलाच घेतला आहे. राज्यातील आघाडी सरकारचे सर्वेसर्वा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी चर्चा झाली. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी ६ वाजता दोघा नेत्यांत भेट झाली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी १ मे रोजी औरंगाबदेत जाहीर सभा आहे, तसेच ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे काढावेत, असा इशारा मनसेने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर आहेत. मात्र प्रचाराच्या वातावरण निर्मितीला प्रारंभ झाला आहे. विरोधक भडकावू वक्तव्य करत आहेत. मोठ्या सभांचा तारखा निश्चित झाल्या आहेत. विरोधकांच्या कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या कृतीला उत्तर कसे द्यायचे यावर चर्चा झाल्याचे समजते.ठकीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार शरद पवार हे दोनच नेते होते. त्यामुळे या दोन नेत्यांच्या चर्चेतील तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.

Previous articleयोगी कोण आणि भोगी कोण ? राज ठाकरेंचे मतपरिवर्तन कसे झाले : राऊतांचा टोला
Next articleमोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा! नाना पटोले यांचे फर्मान