राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार की नाही ? शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार असून सत्ताधारी भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केले आहेत.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत असून,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पवार यांची भेट घेवून चर्चा केली.राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी उद्या बुधवारी विरोधी पक्षांच्या बैठक होत आहे.

राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलै रोजी निवडणूक होत आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप समोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत उद्या विरोध पक्षाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेवून चर्चा केली.सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी शरद पवारांना या निवडणुकीत उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार बनण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला असल्याची चर्चा आहे.

Previous articleहम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे ; काँग्रेसचा केंद्रातील भाजप सरकारला इशारा
Next articleकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र; केली महत्वाची मागणी