आपल्या लोकशाही आणि घटनेसाठी …आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत चालले

मुंबई नगरी टीम

हिंगोली । राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून,आज हिंगोली येथे या यात्रेत शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सहभागी झाले.यावेळी राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरे यांना अलिंगन देत त्यांचे स्वागत केले.तर आपल्या लोकशाही आणि घटनेसाठी यात्रेत चाललो असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नांदेड येथे काल राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सहभागी झाले होते.आज भारत जोडो यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचा मित्रपक्ष शिवसेना पक्षही सहभागी झाला. आज शिवसेनेचे नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या यात्रेला हजेरी लावली.आदित्य ठाकरे हे यात्रेत सहभागी होताच राहुल गांधी यांनी त्यांना अलिंगन देत त्यांचे स्वागत केले.भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे ठाकरे आणखी काही नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.तर आपल्या लोकशाही आणि घटनेसाठी यात्रेत चाललो असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Previous articleचंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या मेंदूचा आधी तपास करुन घ्यावा
Next articleजितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्यावर शरद पवार निर्णय घेणार…आता आव्हाडांच्या भूमिकेकडे लक्ष !