खूशखबर : सर्व शाळांमधिल इयत्ता ४ पर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतरच भरणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी विशेषत: खासगी शाळांचे पुर्व माध्यमिक ते इयत्ता ४ थीचे वर्ग सकाळी ७ वाजता भरतात. विद्यार्थी रात्री उशीराने झोपून सकाळी लवकर उठत असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास असल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या,सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जावेत असे निर्देश राज्य शासनाने निर्देश दिले असल्याने आता खासगी शाळांसह सर्व माध्यमांच्या शाळांमधिल पुर्व माध्यमिक ते इयत्ता ४ थीचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्यात येणार आहेत.

राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याच्या सूचना केल्या होत्या.राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळा विशेषत: खासगी शाळांचे पुर्व माध्यमिक ते इयत्ता ४ थीचे वर्ग सकाळी ७ वाजता भरतात.त्यामुळे रात्री उशीराने झोपत असलेले विद्यार्थी सकाळी शाळेत जाण्यासाठी लवकर उठतात.त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत असल्याने शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या,सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जावेत असे निर्देश दिले आहेत.या निर्णयामुळे आता राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधिल पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे सकाळच्या सत्रातील वर्ग सकाळी ९ नंतरच भरवले जाणार आहेत.या निर्देशाचे पालन करण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपवण्यात आली आहे.

Previous articleअजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष ; पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला
Next articleमाजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींना अजित पवार गटाकडून राज्यसभेची लॅाटरी ?