मुंबई नगरी टीम
मुंबई: बेस्ट कामगारांच्या नऊ दिवसांच्या संपाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला. मराठीच्या मुद्यावर त्यांनी पाठिंबा दिल्याने राज ठाकरेंना फायदा होणार असून असंख्य बेस्ट कामगार मनसेकडे वळत आहेत,असे दिसत आहे.
बेस्ट संप मिटल्याची घोषणा कामगार नेते शशांक राव यांनी केली तेव्हा कामगारांनी राज ठाकरेंच्या नावानेही घोषणा दिल्या होत्या.मराठीच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेने संपातून अंग काढून घेतल्याने बेस्ट कामगार सेनेतील मराठी कामगार शिवसेनेवर नाराज आहेत.अनेक कामगारांनी सेनेचा राजीनामा दिला आहे.तर मराठीच्या मुद्यावरच राज ठाकरे यांनी बेस्ट संपाला पाठिंबा दिल्याने अनेक कामगारांना मनसेबद्दल सहानुभूती वाटत आहे.बेस्टमध्ये जवळपास सर्वच कामगार मराठी असून ते मुंबई आणि लगतच्या परिसरात राहतात.