मनसेने लोकसभा निवडणूक लढवावी आणि डिपॉझीट वाचवून दाखवावे
मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठींबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवा आणि डिपॉझीट वाचूवन दाखवा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत केलेल्या विधानावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, आज रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटक होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळाल. परवा मुख्यमंत्री म्हणाले बारामतीचा पोपट! त्याला अधोरेखित करणारे आजचे भाषण होते. मला आता मनसेला म्हणायचे आहे की, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटत की राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते आहेत, तरीसुध्दा आपल्या सैन्यांनी जी कामगिरी केली, त्यावर अशा पध्दतीने बोलण हा सैन्यांचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे ते हिरो होऊ इच्छितात का? अशा पध्दतीचा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येईल, असे आजच वक्तव्य होत. पोपटाचा रंग हिरवा असतो तो पाकिस्तानचा तरी नाही ना असे मला वाटते, असा उपरोधिक टोला आज शिक्षणमंत्री तावडे यांनी लगावला.