शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर ?

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर ?

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असतानाच आता शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे असल्याचे समजते मात्र गृह, अर्थ,नगरविकास आणि महसूल ही महत्वाची खाती सोडण्यास भाजपाने स्पष्ट नकार दिल्याची चर्चा आहे.

 आज भाजपाच्या झालेल्या बैठकीत विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगून अफवांवर विश्वास ठेवू नका असे स्पष्ट केल्यानंतर  अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावर अडून बसलेल्या शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतल्याचे चित्र आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १८ कॅबिनेट तर ९ राज्यमंत्री आहेत. शिवसेनेचे ६ कॅबिनेट तर ७ राज्यमंत्री आहेत.नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला वाटा वाढवून हवा असल्याने शिवसेनेने निम्या निम्या मंत्रीपदाची  मागणी लावून धरली असल्याने भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह १३ मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे समजते.

 

Previous articleराष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार
Next articleशेतक-यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार