विखे पिता पुत्रांवर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही

विखे पिता पुत्रांवर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या भाजपाच्या पराभवानंतर माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे आज प्रथमच समोरासमोर आले.अहमदनगर जिल्ह्यात राम शिंदे,शिवाजी कर्डीले,स्नेहलता कोल्हे,बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.या पराभूत भाजपाच्या नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली गेली होती.त्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.विखे पिता पुत्रांवर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही असे राम शिंदे यांनी या बैठकीनंतर सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात राम शिंदे,शिवाजी कर्डीले,स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे,वैभव पिचड यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभूत भाजपाच्या नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांना मदत केल्याने पराभवाला सामोरे जावे लागले असल्याची तक्रार या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली गेली होती.राज्यात भाजपाचे सरकार आले तर विखे पाटील यांना मंत्रिपद देऊ नये अशीही मागणी या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केली होती. नगर जिल्ह्यातील या वादावर तोडगा काढण्यासाठी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,संघटनमंत्री विजय पुराणीक यांच्या उपस्थित नगर जिल्ह्यातील नेत्यांची बैठक पार पडली.या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, राम शिंदे, शिवाजीराव कर्डिले, मोनिका राजळे आदी नेते उपस्थित होते.या बैठकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच माजी मंत्री राम शिंदे व राधाकृष्ण विखे पाटील समोरासमोर आले होते. विधानसभा निवडणुकीसंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात झाली.तसेच जिल्ह्यात होणा-या जिल्हा परिषद निवडणुका व जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही चर्चा झाली.तासभर झालेल्या या बैठकीत पराभूत झालेल्या उमेदवाराचे म्हणणे आणि तक्रारी विरोधी पक्षनेते फडणवीस आणि पुराणीक यांनी ऐकून घेतले.या तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यास आणि अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती राम शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आज झालेल्या बैठकीच्या निमित्ताने राम शिंदे आणि विखे पाटील समोरासमोर आले होते. या बैठकीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकुण घेण्यात आले.आज झालेल्या बैठकीत नगर जिल्ह्यातील पराभवाबाबत जे जबाबदार असतील त्याबाबत कार्यवाही करण्याचा निर्णय झाला असल्याने आमचे समाधान झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या नगरमध्ये भाजपा कोअर कमिटीची बैठक होणार आहे.याची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील व माझ्यावर सोपविण्यात आल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.राम शिंदे आणि शिवाजी कर्डिले यांनी पराभवासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांना जबाबदार धरले असून, विखे पिता पुत्रांवर कारवाई झाल्याशिवाय आमचे समाधान होणार नाही असेही शिंदे म्हणाले.

Previous articleWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. १५ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९
Next articleअवैध व विना परवाने फलक लावणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई