रत्नागिरीतील पाच ग्रामपंचायतींसाठी ६ फेब्रुवारी रोजी मतदान

रत्नागिरीतील पाच ग्रामपंचायतींसाठी ६ फेब्रुवारी रोजी मतदान

मुंबई नगरी टीम

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या सुकवली, बहिरवली, चौगुले मोहल्ला,रजवेल आणि शिर्शी या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६ फेब्रुवारी २०२० रोजी मतदान; तर ७ फेब्रुवारी २०२० रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, मुदत संपणाऱ्या या पाच ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे १६ ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी २२ जानेवारी २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २४ जानेवारी २०२० पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान  फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२० रोजी होईल.

Previous articleमंत्री उदय सामंत यांनी घेतला रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा
Next articleदेवेंद्र फडणवीस यांचा गारपीट आणि पावसात प्रचार