कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघाचे अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी  शिवबंधन बांधून शिवसेनेत  प्रवेश केला.गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होण्याची शक्यता आहे.

नेवासा मतदार संघाचे अपक्ष आमदार आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज मातोश्रीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेवून शिवसेनेत प्रवेश केला.मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला.गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नगर जिल्ह्यात शिवसेना आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे.यावेळी सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.विधानसभेचे निकाल लागल्या नंतर गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.गडाख यांना शिवसेनेकडून थेट कॅबिनेट मंत्री केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेना सतेत असो वा नसो मी तुमच्याबरोबर राहील असा ठाम शब्द गडाख यांनी त्यावेळी ठाकरे यांना दिला होता.

नगर मधील शिवसेनेचे माजी मंत्री व उपनेते अनिल राठोड यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. त्याच्या निधनामुळे नगर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.गडाख यांनी आज शिवबंधन बांधल्याने नगर जिल्ह्यात शिवसेना वाढीला मोठी मदत होणार आहे. शिवसेना प्रवेशामुळे शेतकऱ्यांचे तसेच विविध प्रश्न मी अधिक जोमाने सोडवू शकेल असे, असे गडाख यांनी शिवसेना प्रवेशावेळी  सांगितले.

Previous articleमहाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्धार
Next articleछत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही! काँग्रेस नेत्याचा टोला