मनसेचे सामाजिक भान; पोहच केल्या घरोघरी गणेशाच्या मूर्ती  

मुंबई नगरी टीम

मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवार कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना अनेकांकडून याची खबरदारी घेतली जात.या पार्श्वभूमीवर मनसेने सामाजिक भान जपत”आम्ही आणू बाप्पा आपल्या घरी” हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमांतर्गत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी माहिम, दादर, प्रभादेवी या भागात गणपतीच्या मूर्ती घरोघरी पोहचविल्या आहेत.तसेच मनसेच्या इतर पदाधिका-यांनी देखील आपल्यापरीने हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसैनिकांनी हा उपक्रम राबवला. मनसेच्या पदाधिका-यांनी मुंबईतील अंधेरी, परळ, बोरीवली, भांडूप-मुलुंडसह थेट कोकणात देखील हा उपक्रम राबवला आहे. मनसे सरचिटणीस व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी कोकणात हा उपक्रम राबविला. तसेच पश्चिम उपनगरांतील अंधेरी-विलेपार्ले या भागात मनसे सरचिटणीस संदीप दळवी यांनी उपक्रम राबविला. तर सोलापूरमध्ये मनसे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी मूर्ती लोकांच्या घरोघरी पोहचविल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात गणेश भक्तांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोविडच्या या महामारीत लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामाजिक भान जपत हा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत मनसेच्या पदाधिका-यांपासून ते कार्यकर्त्यांनी गणेशपूजनाचे साहित्य, गणेश मूर्ती थेट गरजूंच्या घरा घरात पोहचविल्या.मनसेनेच्या या उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Previous articleउत्सव असला तरी ही आपली कसोटी : मुख्यमंत्री ठाकरे
Next articleविठ्ठल मंदिर खुले करा अन्यथा एक लाख वारकरी आंदोलन करणार