हॉटेल,जिम सुरू करा ; रोहित पवारांची सरकारकडे मागणी

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल,जिम व्यवसाय बंद आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेनुसार हॉटेल चालकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली आहे. तर जिम आणि क्लासेसवरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. हॉटेल,जिम,क्लास चालक जर खबरदारी घेणार असतील तर त्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

कोरोनबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडे दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता रेस्टॉरंट, जिम, क्लास चालक घेत असतील. तर, त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असे माझे व्यक्तीगत मत आहे सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरी ओम असा नारा देत अनेक लॉकडाउनच्या नियमांमध्ये शिथिलता दिली. पंरतु यामध्ये जिम आणि क्लास चालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. हॉटेल चालकांना केवळ घरपोच सेवेची परवानगी देण्यात आली. त्यामुळे हॉटेल आणि जिम आता सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चालकांकडून केली जात आहे. पंरतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सरकारने याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. तसेच धार्मिक स्थळेही तूर्तास बंदच आहेत. त्यामुळे आता अनलॉकच्या पुढील टप्प्यात, हॉटेल, जिम, क्लास, धार्मिक स्थळे यावर कोणता निर्णय सरकार घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Previous articleलॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीतून सरकारच्या तिजोरीत ३ हजार ८४२ कोटींची भर
Next articleमराठा समाजाला दिलासा : आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ मिळणार