घासून नाय,तर विरोधकांची ठासून; ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा विजयी गुलाल

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडताना पाहायला मिळत आहे. निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी विजय मिळवत आपले वर्चस्व स्थापित केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपने एकमेकांना कडवी टक्कर देत विजय मिळवला आहे. यामध्ये मनसे देखील मागे नाही. निवडणुकीच्या निकालांत इतर पक्षांची घौडदौड सुरू असतानाच मनसेही आपला विजयाचा झेंडा फडकावला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचात निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यात मनसेने शिवसेना आणि भाजप युतीचा धुव्वा उडवत विजय मिळवला आहे. काकोळी ग्रामपंचायतमधील ७ पैकी ४ जागा जिंकल्या आहेत. ही निवडणूक स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेली. मात्र मनसेने युतीच्या उमेदवारांचा पराभव करत जल्लोष साजरा केला आहे. “घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ काकोळी ग्रामपंचायत मधील ७ पैकी ४ सदस्य विजयी!”, अशा शब्दांत मनसेने विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

‘या’ जागांवर मनसेची विजयी पताका

यवतमाळ : आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीलवर मनसेचा झेंडा, ७ पैकी ६ उमेदवार विजयी
अमरावती : अचलपूर तालुक्यातील ‘खैरी सावंगी वाढोणा’ गट ग्रामपंचायतमध्ये मनसेचे ७ पैकी ७ उमेदवार विजयी! संपूर्ण ग्रामपंचायात ताब्यात देऊन जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनसेने आभार व्यक्त केले आहे.अविनाश पालवे ह्यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यातील शिरसाटवाडी ग्रामपंचायतीवर मनसेचा भगवा, ९ सदस्य विजय. “ही भगव्याची ताकद आहे, नाद करायचा नाय!”, असे म्हणत मनसेने विरोधकांना ठणकावले आहे.

Previous articleग्रामपंचायतींचा निकाल एका क्लिकवर ; अनेक ठिकाणी बड्या नेत्यांना धक्का
Next articleएक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नव्हे!