वाचा : लोकल प्रवासासाठी ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल’ पास कसा काढायचा ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आली असली तरी तिस-या लाटेच्या शक्यतेमुळे मुंबईच्या लोकलमधून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांनाच प्रवासाची मुभा असली तरी बोगस ओळखपत्राद्वारे लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाल्याने अशा लोकांना आळा घालण्यासाठी सरकारने क्यूआर कोड असलेल्या पासची पद्धत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या घटली असली तरी लोकल पुन्हा एकदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहे.सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना लोकल प्रवासाची परवानगी असली तरी अनेक जण बोगस ओळखपत्राद्वारे लोकलमधून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.मध्य रेल्वेतून दररोज सुमारे १८ लाख तर पश्चिम रेल्वेतून १२ लाख प्रवाशी प्रवास करीत आहेत.त्यातील ५० टक्के प्रवाशी बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करीत असल्याचे सांगण्यात येते.अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी आता राज्य सरकारने युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास पद्धत म्हणजेच क्यूआर कोड असलेल्या पासची पध्दत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी अत्यावश्यक सेवेत असणा-या आस्थापनांना आपल्या कर्मचा-यांची सर्व माहिती सादर करावी लागणार आहे.त्याच्या सत्यतेची पडताळणी केल्यानंतर संबंधित कर्मचा-याला क्यूआर कोड दिला जाणार आहे.क्यूआर कोडचे ओळखपत्र असेल त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे.क्युआर कोड असलेले पास स्मार्टफोन किंवा क्युआर रिडर मशीनद्वारे तपासण्यात येणार आहेत. क्युआर कोड असलेला पास असलेल्यांना तिकीट खिडकीवरुन पास व तिकीट मिळू शकणार आहे.मात्र क्यु-आर कोड पद्धत केव्हा लागू होणार हे समजू शकले नाही.

युनिव्हर्सल ट्र्रॅव्हल पास  मिळवण्यासाठी वेबसाईट
https://epassmsdma.mahait.org/

Previous articleजनतेतील असंतोष दडपण्यासाठी ठाकरे सरकारकडून तिसऱ्या लाटेची भीती !
Next articleगणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी:यंदाही सार्वजनिक मंडळांची मूर्ती ४ फूटांची असणार