शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रीपद देवून राज्यात पुन्हा भाजप सेनेचे सरकार : आठवलेंनी मांडले गणित

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी अदारांजली ठरेल;त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन भाजपला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन राज्यात पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करावे,त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

दादर शिवजीपार्क येथे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्त त्यांच्या स्मृतिस्थळी आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुतीची एकजूट उभी केली होती.काँग्रेस राष्ट्रवादीला हद्दपार करून भाजप,शिवसेना, आरपीआय शिवशक्ती भिमशक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी पुन्हा भजप शिवसेनेने एकत्र यावे. त्यासाठी शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला ५० टक्के सत्तेतील सहभाग द्यावा, या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन आठवले यांनी केले.

Previous articleभाजप नेत्याला स्थायी समितीतून काढण्यासाठी महापालिकेने खर्च केले तब्बल १ कोटी
Next articleअमरावती दंगल प्रकरणी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल; मोदींवर साधला निशाणा