” मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा ” ! जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल ठाण्यात उत्तर सभा पार पडली.या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले.राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडांचा चेहरा नागाने फणा काढावा असा असल्याचा टोला यावेळी राज ठाकरे यांनी लगावला.त्यानंतर आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यात काल झालेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेला प्रचंड प्रतिसाद मिळावा.या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली.शिवाजी पार्क मधिल सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरून मुद्द्यावर राज्य सरकारला लक्ष्य केले होते. यावर जितेंद्र आव्हाड यांनी साधा वस्तराही सापडणार नाही, कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला,तरी मी संन्यास घेईन असे आव्हान आव्हाड यांनी राज ठाकरे यांना दिले होते.त्यावरून काल ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी आव्हाड यांचा समाचार घेतला. राज ठाकरे यांनी आव्हाडांची नक्कल करत त्यांना टोले लगावले.यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा ? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला ? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या या टीकेला आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.हे मिमिक्री आर्टिस्टचे काम आहे.पण ज्याच्यात प्रगल्भता आहे, जो समोरच्यांचा आादर करतो जे महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे, ज्याची समाजात प्रतिष्ठा आहे त्यांना मी अरे तुरे करत नाही. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे असे जर तुम्ही म्हणाल तर मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावे का ? तो भाग कोणता हे महाराष्ट्र ओळखतो,अशा शब्दात आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

Previous articleधनंजय मुंडेंना हृदयविकाराचा धक्का नव्हे तर भोवळ;अजितदादांनी घेतली भेट,मुख्यमंत्र्यांनी केला फोन
Next articleदोन वर्षानंतर मुख्यमंत्री मंत्रालयात;विविध विभागांना भेटी,कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे केली चौकशी