‘जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ : राज ठाकरे

मुंबई नगरी टीम

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे.यानिमित्ताने राजकीय नेते तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणा-यांकडून त्यांना अभिवादन केले जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रबोधनकार यांना अभिवादन केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच्या स्मृतीला उजाळा देत त्यांच्या शिकवणीची आठवण करून दिली आहे.

“उक्ती आणि कृती’ ह्यांचा उत्तम मेळ कसा असावा,हे आजोबांच्या आयुष्याकडे बघितलं की लक्षात येतं. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे ते निडर समाजसुधारक होते. पाखंडी मानसिकता, अनिष्ट रूढी, जाती-व्यवस्था ह्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही शस्त्र वापरली.
पुढे वय झालेलं असताना देखील त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, ह्या चळवळीतील विविध पक्षांना, विचारधारांना एकत्र बांधून ठेवणं निव्वळ त्यांनाच शक्य होतं. कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या विरोधात संघर्ष करताना त्यांचं वय कधीच आड आलं नाही आणि त्याच ताकदीने ते आसूड ओढत राहिले. निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे”, असे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या आजोबांना आदरांजली वाहिली आहे.

Previous articleवीज बिल थकबाकीच्या चौकशीवरून देवेंद्र फडणवीसांनी दिले सरकारला आव्हान !
Next articleराज्यातील कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ का झाली ? महापौरांनी सांगितले ‘हे’ कारण