आता तरी सरकार जागं होणार का ? : प्रविण दरेकर

मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात गुन्हेगारीचे भयानक चित्र उभे राहिले आहे. हे महाराष्ट्राच्या अस्मितेला अशोभनीय आहे. आता तरी सरकार जागं होणार आहे कि नाही असा रोखठोक सवाल विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

पनवेल मधील शारदा माळी नावाच्या महिलेल्या जाळण्याची घटना समोर आली.त्यानंतर या महिलेला फासावर लटकविल्याचे भयानक चित्र समोर आले.यामध्ये पीडित महिलेच्या मुलीने आणि पतीने पीडित महिलेने स्वतः फाशी घेऊन हत्या केल्याचा आरोप केला आहे.या प्रकरणात फाशी असो किंवा हत्या मात्र, यात दुर्दैव हे महाराष्ट्राचं आहे. राज्यात कोणाचा विनयभंग होतोय,कोणाला जाळलं जातंय, कोण स्वतः पेटवून घेतय अशाप्रकारचे गुन्हे महाराष्टात रोज घडत आहेत.महाराष्ट्रात गुन्हेगारीचे भयानक चित्र उभे राहिले आहे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला अशोभनीय आहे. आता तरी सरकार जागं होणार आहे कि नाही असा रोखठोक सवाल विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.

दरेकर म्हणाले, राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर भाष्य करताना मी कालच सरकारला आवाहन केलं होतं की रोज राज्यात अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत, यावर काहीतरी कृतिशील योजना आखण्याची आवश्यकता आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या विषयात हस्तक्षेप करून उपाययोजना तात्काळ करण्याची विनंती केली होती,पोलिसांचा दरारा बसणे आवश्यक. या ठिकाणी गृहमंत्री दररोज विधान करतात आणि आम्ही मागण्या करतोय मात्र गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक खुलेआम या ठिकाणी चूक वागतात. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्यांचे अपयश या ठिकाणी आहे,महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाल्याचे चित्र असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.

Previous articleनांदेड मधील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी ; भाजपचा धुव्वा
Next articleपनवेलमधील महिलेला जाळल्याच्या प्रकरणातील आरोपींविरुध्द कठोर कारवाई