राज ठाकरे हे स्वत: ला बाळासाहेब ठाकरे समजायला लागलेत : उद्धव ठाकरे गरजले

मुंबई नगरी टीम

मुंबई । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रखर हिंदुत्वाची जाहीर भूमिका घेतली आहे.शिवाय ते शिवसेना प्रमुख जशी भगवी शाल घ्यायचे तशीच शाल देवून राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करीत,राज ठाकरे हे भाजपाची ‘बी’ टीम नाही तर ‘ढ’ टीम आहे,असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना खासदारांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत असे सांगतानाच,राज ठाकरे हे भाजपाची बी टीम नव्हे तर ढ टीम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.मुन्नाभाई चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो असा भ्रम होतो.त्या प्रमाणेच हे राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत असे समजू लागले आहेत.अयोध्येत श्रीरामाचे मंदिरासाठी शिवसेनेने आंदोलन केले. त्यावेळी मनसे काय करत होती तसेच बाबरी मशीद पाडली त्यावेळी राज ठाकरे कुठे होते असा सवालही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विरोधकांवर तुटू पडा, त्यांचे खोटे हिंदुत्व उघडे पाडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना खासदारांची काल बैठक झाली. राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेची महत्त्वाची बैठक होती. सेनेचे नेते, प्रवक्ते आणि खासदार बेठकीला उपस्थित होते. भाजप आणि विरोधकांवर तुटून पडा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या. शिवसेनेची काम जनतेपर्यंत पोहोचवा, असे उद्धव म्हणाले. पक्ष बांधणी व पक्षविस्तार हे या बैठकीचे सूत्र होते.शिवसेना खासदारांच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती.

भाजप आणि राज ठाकरे यांचे हिंदुत्त्व खोटे आहे, हे जनतेला दाखवून द्या. शिवसेनेची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आदेश उद्धव यांनी खासदारांना दिले. बाबरी मशीद पडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवाल उद्धव यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख या नात्याने उद्धव यांनी अनेक विषयावर आपल्या खासदारांना मार्गदर्शन केले.८ जून रोजी मराठवाड्यात उद्धव यांची सभा घेण्याचे निश्चित झाले. १४ मे रोजी मुंबईत उद्धव यांची सभा होणार आहे. लोकसभेचे १८ पैकी दोन खासदार बैठकीला अनुपस्थित होते. १४ मे पासून मुंबईतील तर २६ मे पासून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील शिवसंपर्क अभियानाचा टप्पा सुरु होणार आहे. विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेनेचे स्थान पूर्वीप्रमाणे कायम राखण्यासाठी जोमाने काम करा, असे उद्धव यांनी बजावले.

Previous articleमोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा! नाना पटोले यांचे फर्मान
Next articleहनुमान चालीसा म्हणण्याने बेकारी,भुकेचा प्रश्न सुटणार आहे का ? शरद पवार